श्री क्षेत्र स्वामी समर्थ देवस्थान माळकूप येथे १५ लक्ष रु सभामंडपाचा भूमिपूजन समारंभ संपन्न .

दिव्य जनलोक – शिवशंकर शिंदे

पारनेर तालुक्यातील माळकूप येथे लाखो स्वामीभक्तांचे श्रद्धास्थान प्रति अक्कलकोट असलेले स्वामी समर्थ देवस्थान येथे गुरुवार दिनांक १०/१०/२०२४ रोजी येथे नवीन सभामंडपाचे भूमिपूजन भाजपाचे प्रदेश कार्यकारणी अध्यक्ष श्री विश्वनाथदादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री बंडूशेठ रोहोकले, जिल्हा भाजप कार्यकारणी सदस्य श्री संभाजी आमले ,श्री दीपक रोहोकले ,श्री पोपट लोंढे , जगदीश आंबेडकर, श्री अरुणराव ठाणगे व स्वामी समर्थ देवस्थान येथील माजी सरपंच श्री बाळासाहेब शिंदे ,श्री संभाजी नाबगे ,श्री बबन शिंदे गुरुजी ,श्री भास्कर काळे आदी मान्यवर व हजारो स्वामीभक्त उपस्थित होते.जि प सार्वजनिक बांधकाम विभाग पारनेर यांच्याकडून २५१५ – १२३८ ग्रामविकास निधी योजनेतून १५ लक्ष रु. चा निधी सभामंडपासाठी मिळालेला आहे .यापुढील काळातही असेच भरीव योगदान शासनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले.यावेळी महाआरती श्री विश्वनाथदादा कोरडे यांच्या हस्ते करण्यात आली. श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. यापूर्वी या ठिकाणी जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीची सभापती श्री काशिनाथ दाते सर यांनीही सभामंडप दिलेला होता. परंतु दिवसेंदिवस स्वामीभक्तांची वाढणारी संख्या लक्षात घेता सभामंडप अपुरा पडत होता. नवीन सभामंडपामुळे स्वामी भक्तांची गैरसोय दूर होणार आहे या वेळी गुरुवारी महाअन्नदानाची व स्वामींची आरती सेवेचा लाभ घेणारे हिवरे कोरडा येथील स्वामीभक्त श्री शिवाजी साळबा कोरडे व त्यांच्या पत्नी सौ.पार्वती शिवाजी कोरडे व श्री संभाजी नाना ठाणगे यांच्या हस्ते श्री विश्वनाथदादा कोरडे यांचा सन्मान करण्यात आला व श्री विश्वनाथ दादा कोरडे यांनी गुरुवारच्या झालेल्या अन्नदात्यांचे मनापासून आभार मानले व श्री स्वामी समर्थ देवस्थानचे आभार मानले.

श्री स्वामी समर्थ माळकूप येथे प्रती अक्कलकोट करण्याचा सर्व आम्हां स्वामीभक्तांचा मानस आहे. पारनेर तालुक्यातील सर्वच नेत्यांनी या ठिकाणी विकासकामांसाठी निधी दिलेला आहे. त्यामुळे स्वामींच्या मंदिर परिसरात वैभवात भर पडलेली आहे .दर गुरुवारी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी स्वामीभक्त स्वामींच्या महाआरतीसाठी व दर्शनासाठी येत असतात हा भक्तीचा सागर असाच वाढत राहणार आहे श्री स्वामी समर्थ देवस्थान माळकूप सर्वच स्वामीभक्त परिवार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!