पारनेर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांना पितृशोक..

नामांकित पैलवान माजी उपसरपंच बबनराव कळमकर यांचे निधन

दिव्य जनलोक-वार्ताहर.

पारनेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा पाडळी रांजणगावचे सरपंच श्री. विक्रमसिंह कळमकर यांचे वडील पहिलवान बबनराव कळमकर यांचे प्रदीर्घ आजाराने गुरुवारी पहाटे पुणे येथे रुग्णालयात उपचार घेत असतांना दुःखद निधन झाले, मृत्यूसमयी त्यांचे वय 69 होते.
स्व. बबनराव कळमकर हे जुन्या पिढीतील नामवंत पहिलवान म्हणून प्रसिद्ध होते.पाडळी रांजणगाव कळमकर वाडी येथील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक जडणडणीत त्यांचा मोठा वाटा होता. पाडळी रांजणगाव ग्रामपंचायतचे दहा वर्ष सदस्य असतांना पाच वर्ष उपसरपंच पद त्यांनी भूषविले.स्व. बबनराव कळमकर यांच्या पश्चात पत्नी,मुलगा राष्ट्रवादी चे अध्यक्ष तथा पाडळी रांजणगाव चे सरपंच श्री.विक्रमसिंह कळमकर तसेच सैनिक बॅंकचे माजी व्हा. चेअरमन काशिनाथ कळमकर,निवृत्त ले. कर्नल विश्वनाथ कळमकर,नि.प्राचार्य इंद्रभान कळमकर, सैनिक बँक माजी संचालक सुधाकर कळमकर, नि.सुभेदार मधुकर कळमकर, प्राचार्य अप्पासाहेब कळमकर असे सहा बंधू ,पुतणे अहमदनगर जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन गोकुळ कळमकर,इंजिनियर संदीप कळमकर,दोन बहिणी, पुतणे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. पारनेर तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व सैनिकी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आदर्श आणि आजही एकत्र असणाऱ्या कळमकर कुटूंबातील स्व. बबनराव यांचा मोठा जनसंपर्क, राजकीय तसेच इतर सर्व क्षेत्राचा दांडगा अभ्यास होता व पहिलवान म्हणून पारनेर,शिरूर, श्रीगोंदा तालुक्यात त्यांची ख्याती होती.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अंत्यविधी वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

सोशल सेंटरच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामात योगदान

सन १९९५ साली कळमकरवाडी येथे इंडो जर्मन सोशल सेंटर या संस्थेच्या माध्यमातून पाणलोट समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जलसंधारणाचे कामाचे सक्षमपणे नेतृत्व केल्याने कळमकरवाडी येथील सोशल सेंटर चा प्रोजेक्ट राज्यात आदर्श ठरला. त्यामुळेच संस्थेचे प्रमुख फादर हर्मन बाखर, राज्याचे तत्कालीन मंत्री पतंगराव कदम व बाळासाहेब थोरात,सरपंच पोपटराव पवार यांनी कळमकरवाडी येथे भेट देत जलसंधारण कामांचे कौतुक केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!