सरपंच मनीषा रोकडे यांच्या विरोधातील तक्रार जिल्हाधिकाऱ्यानीं फेटाळली!

सुप्याच्या सरपंच मनीषा रोकडे यांना दिलासा●
◆ अतिक्रमण मुद्द्यावरून सरपंचपद रद्द करण्याची होती मागणी

दिव्य जनलोक-शरद रसाळ
अतिक्रमणाच्या मुद्यावरुन सुप्याच्या सरपंच मनिषा योगेश रोकडे यांचे सरपंच पद रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे नंदकुमार पोपटराव पवार यांनी केली होती. पवार यांच्या अर्जावर सुनावणी होऊन त्यांचा अर्ज जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नामंजूर केला आहे. त्यामुळे सरपंच मनिषा रोकडे यांना दिलासा मिळाला आहे.
पारनेर तालुयातील सुपा ग्रामपंचायतीमध्ये सदस्यांनी एकमेकांविरोधात अतिक्रमणाच्या तक्रारी केल्या होत्या. या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी झाली.त्यात पवार यांनी केलेला अर्ज फेटाळला. नंदकुमार पवार यांनी सरपंच मनीषा रोकडे यांनी सार्वजनिक जागेत अतिक्रमण केले अशी लेखी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. त्यावर सरंपच रोकडे यांनी त्यांचे सविस्तर म्हणणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडले.
सदर जनसेवा हॉटेल हे प्रसाद संभाजी रोकडे यांच्या नावावरुन आढळून आले.त्यामुळे सरपंच मनिषा योगेश रोकडे यांचा जनसेवा हॉटेलशी कोणताही सबंध कागदोपत्री आढळला नाही.


त्रास देण्याच्या उद्देशाने सदर तक्रार

सरपंच मनीषा रोकडे म्हणाल्या की आपणाला
केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने विरोधात अर्ज केला असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नंदकुमार पवार यांचा अर्ज नामंजूर केला. दरम्यान या निर्णयामुळे सरपंच रोकडे यांना दिलासा मिळाला आहे. सरपंच मनिषा रोकडे यांच्या वतीने ॲड युवराज पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!