ग्रामपंचायतच्या माध्यमातून पाडळी रांजणगावचा सर्वांगीण विकास- सरपंच विक्रमसिहं कळमकर

दिव्य जनलोक – शरद रसाळ

     पाडळी रांजणगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यात यश आल्याने गावाचा सर्वांगीण विकास झाला असल्याचे मत पारनेर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा पाडळी रांजणगावचे सरपंच  विक्रमसिहं कळमकर यांनी व्यक्त केले.
  पाडळी रांजणगाव येथे विविध विकासकामांचा शुभारंभ  कळमकर यांच्या हस्ते पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सोसायटी चेअरमन  डी.बी.आण्णा करंजुले हे होते.
   यावेळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून जाधव वस्ती येथे  पथदिवे बसविणे ७ लक्ष रुपये, ब्रिटानिया कंपनीच्या सी एस आर फंडातून गावठाण अंगणवाडी नूतनीकरण कामाचे लोकार्पण, प्राथमिक शाळा वॉल कंपाऊंड व स्वागत कमान करणे कामाचे भूमिपूजन, सार्वजनिक ठिकाणी सी सी टीव्ही बसविणे लोकार्पण व गावातील महिलांना मोफत कचरा कुंडी वाटप करणे आदी कामांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

उपस्थित मान्यवर

 या कार्यक्रमाला चेअरमन डी.बी.आण्णा करंजुले,शिक्षण विस्तार अधिकारी ढवळे साहेब, केंद्रप्रमुख  गवळी साहेब, उपसरपंच संगम साठे, व्हा चेअरमन अप्पासाहेब कळमकर, तंटामुक्ती अध्यक्ष अप्पासाहेब साठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, माजी चेअरमन कचरू अण्णा उबाळे, सुभाष उबाळे,सोसायटी संचालक कांतीलाल उबाळे, किरण साठे, शहाजी साठे, भाऊसाहेब उबाळे, प्रभाकर करंजुले, गोकुळ करंजुले, वसंत जाधव, गोरख जाधव, भास्कर पाटील, शाहजी करंजुले, माधव जाधव, भगवान करंजुले, अरुण उबाळे,ताराचंद करंजुले,आकाश साठे, सागर उबाळे,चेअरमन नितीन साठे, ब्रिटानियाचे राऊत, जेऊरकर,अमित करंजुले, हरीनाना उबाळे, सोपान करंजुले, मुख्याध्यापक जाधव सर, ग्रामसेवक सचिन थोरात यांच्या सह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

पाडळी रांजणगाव येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावातील महिलांना मोफत कचरा कुंडी वाटप व सार्वजनिक कचरा संकलन सायकल लोकार्पण करतांना सरपंच श्री. विक्रमसिंह कळमकर, चेअरमन डी. बी. करंजुले, उपसरपंच संगम साठे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. अप्पासाहेब साठे, चेअरमन नितीन साठे, आदी.(छाया – शरद रसाळ, पारनेर.

पाडळी रांजणगाव ग्रामपंचायतच्या वतीने गावातील सार्वजनिक ठिकाणी बसवलेल्या सी सी टीव्ही कॅमेऱ्याचे अनावरण करतांना जेष्ठ सोसायटी संचालक कांतीलाल उबाळे व मान्यवर..

पाडळी रांजणगाव येथील जाधव वस्ती येथे पथदिवे बसविणे या कामाचा शुभारंभ करतांना पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा पाडळी रांजणगाव चे सरपंच श्री. विक्रमसिंह कळमकर, सोसायटी चेअरमन श्री. डी. बी. करंजुले (अण्णा ), तंटामुक्ती अध्यक्ष कृषीभूषण श्री अप्पासाहेब साठे, व्हा चेअरमन श्री. अप्पासाहेब कळमकर, उपसरपंच संगमभैय्या साठे,वसंतराव जाधव, भाऊसाहेब उबाळे, भास्कर पाटील, प्रभाकर करंजुले, गोकुळ करंजुले, लाईनमन श्री. घुले, गोरख जाधव, कैलास जाधव, शहाजी करंजुले, मारुती जाधव आदी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!