देवदैठण केंद्रावर शासकीय रेखाकला परीक्षा उत्साहात

दिव्य जनलोक-दीपक करंजुले

महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ,मुंबई यांच्या वतीने नुकत्याच घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा श्री संतश्रेष्ठ निंबराज महाराज विद्याधाम प्रशाला देवदैठण केंद्रावर उत्साहात पार पडल्या .
यामध्ये एलिमेंटरी ड्रॉईंग ग्रेड परीक्षेमध्ये २९३ विद्यार्थी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड परीक्षेत २१३ असे एकूण ५०६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. या सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये वस्तूचित्र, स्थिरचित्र, स्मरण चित्र, संकल्पचित्र, भूमिती व अक्षरलेखन या विषयांचे रेखांकन व रंगकाम करण्याचा आनंद घेतला.

ड्रॉईंग ग्रेड परीक्षांची प्रमाणपत्रे दृककलांच्या विशेष उच्च अभ्यासक्रमात प्रवेश मिळविण्यासाठी आवश्यक पात्रता म्हणून मानली जातात. तांत्रिक, अभियांत्रिकी आणि इतर संबंधित अभ्यासक्रम पूर्ण करु इच्छिणाऱ्या तसेच जीवनातील इतर व्यवसाय अंगीकारणाऱ्या विद्यार्थ्यांना या ड्रॉईंग ग्रेड परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या आहेत. तसेच इयत्ता १०वी साठी वाढीव गुण यामध्येही या परीक्षांचे गुण धरले जातात.

अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य, केंद्र संचालक बी.बी. डोके व पर्यवेक्षक एन. डी.डुंबरे यांनी दिली.केंद्रावरील परीक्षेचे सर्व कामकाज प्रशालेचे कलाध्यापक संदीप वेताळ तसेच सर्व अध्यापक, अध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी यांनी पाहिले.

या शाळांचा सहभाग

केंद्रावर विद्याधाम प्रशालेसह संस्कार पब्लिक स्कूल देवदैठण, महात्मा गांधी विद्यालय राजापूर ,मुंजाबा माध्यमिक विद्यालय उक्कडगाव ,पद्मभूषण वसंतदादा पाटील विद्यालय पिंप्री कोलंदर,एंजल्स इंग्लिश मीडियम स्कूल बेलवंडी ,संत ज्ञानेश्वर विद्यालय ढवळगाव ,कै. अण्णासाहेब शिंदे विद्यालय पाडळी रांजणगाव, म्हसे माध्यमिक विद्यालय म्हसे, भैरवनाथ विद्यालय निंबवी, ज्ञानेश्वर विद्यालय रुई छत्रपती, ज्ञानगंगा विश्वविद्यालय शिरूर, ज्ञानगंगा इंटरनॅशनल स्कूल शिरूर, सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर या सर्व शाळांचे विद्यार्थी परीक्षेत सहभागी झालेले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!