तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूर ने गाजवले मैदान

सर्वाधिक पदके मिळवून २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड.

दिव्य जनलोक-दीपक करंजुले

सी.टी बोरा काॅलेज शिरूर या ठिकाणी झालेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत विद्याधाम प्रशाला शिरूरच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून जिल्हा पातळीवर २२ खेळाडूंची निवड झाली अशी माहिती प्रशालेचे प्राचार्य श्री गुरूदत्त पाचर्णे यांनी दिली.विविध मैदानी क्रीडा प्रकारांमध्ये प्रथम क्रमांकात १० खेळाडू, द्वितीय क्रमांकात १२ खेळाडू आणि तृतीय क्रमांकात १२ खेळाडू अशा एकूण ३४ खेळाडूंनी यश मिळवले.त्यामधील २२ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली.

या शिक्षकांचे मिळाले मार्गदर्शन

या सर्व यशस्वी खेळाडूंना क्रिडा विभाग प्रमुख सचिन रासकर, क्रिडा स्पर्धा प्रमुख भास्कर करंजुले, संदीप तानवडे, संतोषकुमार देंडगे, हरी पवार, हरीभाऊ भुसारे, संदीप यादव, गोपाळ कुल, कल्पना भोगावडे, पूनम पवार, कल्पना फराटे, ललिता भुजबळ यांनी मार्गदर्शन केले.

मान्यवरानीं केले अभिनंदन

सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष अनिल बोरा, सचिव नंदकुमार निकम, शालेय समितीचे अध्यक्ष धरमचंदची फुलफगर तसेच प्रशालेचे प्राचार्य गुरूदत्त पाचर्णे, पर्यवेक्षक दिगंबर नाईक,मच्छिंद्र बनकर, चंद्रकांत देविकर यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!