परिश्रम हाच यशाचा मार्ग – शिवाजीराव ठोकळ

दिव्य – जनलोक – शिवशंकर शिंदे

  सतत केलेले परिश्रम जिद्द चिकाटी आणि अभ्यासात सातत्य हाच यशाचा खरा मार्ग असल्याचे प्रतिपादन मुख्याध्यापक शिवाजीराव ठोकळ यांनी व्यक्त केले.
  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दैठणे गुंजाळ येथे शिक्षकदिन कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील जिल्हा परिषद शाळेत १ ली ते ७ वी पर्यंत वर्ग आहेत. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता ७ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी या दिवशी इयत्ता १ली ते ६ वी च्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे धडे दिले.  यावेळी सुनील नरसाळे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली.

 

राजश्री येवले, श्रावणी घोलप, वैष्णवी येवले, तेजस येवले, ज्ञानेश्वरी येवले यांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचे मनापासून आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नरसाळे यांनी केले आणि सर्वात शेवटी मिठाई वाटून कार्यक्रमाचा समारोप झाला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक हिम्मतराव चेमटे यांनी करून आभार मानले. या वेळी शिक्षक सुनील नरसाळे, हिम्मतराव चेमटे,रामदास शिंदे,विशाल खरमाळे, नितीन चेमटे उपस्थित होते.

( छाया -शिवशंकर शिंदे )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!