सिटीबोरा कॉलेजमध्ये वनस्पती शास्त्र विभागाचा रानभाज्या महोत्सव संपन्न.

दिव्यजनलोक – शरद रसाळ

चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय, शिरूर येथील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने ,”रानभाज्या महोत्सव २०२४” आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये रानभाज्यांविषयी जनजागृती, रानभाज्यांचे संवर्धन व आहारात रानभाज्यांचे महत्त्व यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले गेले. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते सर यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर उपस्थित महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एच.एस. जाधव सर व विज्ञानविद्या शाखा व वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. घनगावकर सर यांनी रानभाज्या व त्याचे संवर्धन याविषयी आपली मते मांडली. याप्रसंगी प्रा. किशोर सस्ते, वनस्पती अभ्यासक, पुणे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्या माहिती, रानभाज्या पाककृती व रानभाज्या संवर्धन विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. रानभाच्या महोत्सवाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. अयोध्या क्षीरसागर यांनी केले.

या महोत्सवासाठी महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. या महोत्सवामध्ये महाविद्यालयातील १०० विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सुमारे ५१ रानभाज्या, फलक व रानभाज्यांची पाककृती उत्कृष्टरित्या सादर केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी टाकळा, सराटा, बांबू, शिंदाड माकड, काटे माठ, राजगिरा, आळू, केना, घोळू. तांदूळजा, करटुले, अंबाडी, सुरण, हादगा, तोंडली, इत्यादी भाज्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या रानभाज्यांच्या विविध पाककृतींनी सर्वांचे लक्ष वेधले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी महोत्सवाला भेट देऊन रानभाज्यांची चव चाखून माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे परीक्षण प्रा. किशोर सस्ते व प्रा.अशोक चौधरी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला पारितोषिक देण्यात आले. महोत्सवाबरोबरच प्रा. गाडेकर व प्रा. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनस्पतीशास्त्र विभागातील विद्यार्थिनींनी पर्यावरण पूरक बीज राख्या तयार केल्या व बीज राख्या प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या. रानभाज्या महोत्सवाचे सूत्रसंचालन प्रा. अपेक्षा गाडेकर व आभार प्रदर्शन डॉ. विकास नायकवडी यांनी केले. या महोत्सवासाठी डॉ. संदीप देवीकर , प्रा. प्रवीण सांगळे, प्रा. दिपाली पवार. प्रा. अभिजीत घावटे, रियाज इनामदार, रोहित वाळके, हनुमंत करपे, प्रतीक्षा जाधव, दुर्गेश बारस्कर यांचे सहकार्य मिळाले.

………..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!